डॉ. आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त MPSC च्या विद्यार्थ्यांचे, बाबासाहेबांना अनोख्या पद्धतीने अभिवादन

गुरूवार, 13 एप्रिल 2023 (21:59 IST)
पुणे: कधी डिजे लावून धिंगाणा केला तर कधी मोठ मोठे कार्यक्रम आणि रॅली आयोजित करुन शक्ती प्रदर्शन केल्याचं आपण पाहिलं आहे. महापुरुषांची जयंती आपण अनेक पद्धतीने साजरी केल्याचं पाहिलं आहे. मात्र पिंपरी-चिंचवडच्या विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.
शिक्षणासाठी, समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा गुरुमंत्र देणारे तसेच असामान्य कर्तृत्व गाजवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १४ एप्रिल जयंती आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे. मात्र पिंपरी-चिंचवड येथील विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अनोख्या पद्धतीने त्यांना अभिवादन करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान बाबासाहेब आंबोडकरांना शिक्षणाची आवड होती. त्यामुळे विद्यार्थ्यांनी थेट 18 तास सलग अभ्यास करण्याचा निश्चय केला आहे. आज सकाळी सहा वाजेपासून हे विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी बसले आहेत. त्यांच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे.
दरम्यान बाबासाहेबांसाठी काही करायचं असेल तर तो फक्त अभ्यास आहे. त्यामुळे आम्ही आभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे, अशा भावना विद्यार्थ्यांनी यावेळी मांडल्या आहेत.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती