पुण्यातील डेपोमध्ये उभ्या असलेल्या बसला आग

शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025 (10:27 IST)
पुण्यातील शिवाजीनगर येथील नरवीर तानाजी वाडी येथील डेपोमध्ये उभ्या असलेल्या एका बसला आग लागली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी पोहोचल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
ALSO READ: पुणे महानगरपालिका प्रमुखांच्या केबिनमध्ये मनसे कार्यकर्ते घुसले, एफआयआर दाखल
शिवाजीनगर येथे नरवीर वाडी येथे गुरुवारी पहाटे 5:30 च्या सुमारास  पीएमपीएमएल बसने अचानक पेट घेतला. आगीची माहिती मिळतातच कसबा अग्निशमनदलाची गाडी घटनास्थळी रवाना झाली. तो पर्यंत बसने चांगलाच पेट घेतला असून काच बाकडे, वायरिंग जाळून खाक झाले.
ALSO READ: पुण्यात खड्यात पडलेल्या दुचाकीस्वाराला कार ने चिरडले,घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
अग्निशमन दलाने 15 ते 20 मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले.आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. आगीमुळे बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 
Edited By - Priya Dixit  
ALSO READ: पुणे गावात जातीय हिंसाचाराचा गुन्हा, 500 हून अधिक जणांविरुद्ध एफआयआर, 17 जणांना अटक

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती