मिळालेल्या माहितीनुसार नागपूर महानगरपालिकेच्या आशीनगर झोनमध्ये काम करणाऱ्या राजू उपाध्याय (५७) यांनी बुधवारी दुपारी जागृती नगर येथील त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आशीनगर झोनच्या अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. यामुळे महानगरपालिकेत खळबळ उडाली आहे.
आशीनगर झोनच्या अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे. मृताचा पुतण्या शुभम उपाध्याय यांनी जरीपटका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शुभमने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सांडपाणी लाइन चेंबरचे झाकण राजू उपाध्याय यांच्या पायावर पडले होते. यामुळे ते कामावर जात नव्हते. त्यांनी आशीनगर झोनच्या अधिकाऱ्यांकडे रजेसाठी अर्जही केला होता. तसेच ते नेहमी म्हणायचे की कामाच्या ठिकाणी त्याच्याशी भेदभाव केला जात आहे. राजू उपाध्याय बुधवारी दुपारी १२.३० च्या सुमारास घरी आले व गळफास घेतला. कुटुंबातील सदस्यांनी त्यांना रुग्णालयात नेले पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
कर्मचाऱ्याच्या आत्महत्येला गांभीर्याने घेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला. पोलिसांना राजू उपाध्याय यांची स्वाक्षरी असलेली एक सुसाईड नोटही सापडली जी व्हायरल झाली. यामध्ये त्याने काही अधिकाऱ्यांची नावे घेतली आहे आणि म्हटले आहे की ते नेहमीच त्याला 'टार्गेट' करायचे. त्याने असेही म्हटले आहे की इतर लोकांचे कामही त्याच्यावर लादले जात होते . पोलिस या सुसाईड नोटची चौकशी करत आहे.