आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला कोकिला व्रत आरंभ होते. हे व्रत श्रावण पौर्णिमेपर्यंत सुरु राहते. शास्त्रानुसार हे व्रत प्रथम देवी पार्वतीने शिव पती म्हणून मिळावा म्हणून केले होते. शास्त्रानुसार भगवान शिव यांचा विवाह दक्ष प्रजापतिची मुलगी सती यांच्यासोबत झाला होता. प्रजापति शिवाला पसंत करत नव्हते, म्हणून प्रजापतिने फार मोठ्या यज्ञाचे आयोजन केले तेव्हा सर्व देवी-देवतांना बोलावले परंतु शिव आणि सतीला आमंत्रण दिले नाही. सतीच्या मनात पित्याचा यज्ञ बघण्याची इच्छा झाली म्हणून त्या शिवाकडे हट्ट करून यज्ञस्थळी पोहोचल्या.