श्री कोकिळा माहात्म्य अध्याय सत्ताविसावा

बुधवार, 19 जून 2024 (11:40 IST)
॥ श्रीगणेशाय नम: ॥
श्रीकृष्णे म्हणे धर्मालागून ॥ पुढें करी कथा श्रवण ॥ गत अध्यायीम कौशिक ब्राह्मण ॥ त्याचा पुत्र उठविला ॥१॥
आतां ऐकचित्त देऊन ॥ काय नेम करावें जाण ॥ ते ऐका सादर होवोन ॥ पूजा कथा कोकिळेची ॥२॥
प्रात: स्नान करुन ॥ तेणे देहशुध्द जाण ॥ तिर्थाचें ठायीं जाऊन ॥ स्नान नित्य करावें ॥३॥
धुतलेली वस्त्रें लेवून ॥ संध्या वंदन करुन ॥ संध्या वाचून ब्राह्मण ॥ निद्य असे धर्मराया ॥४॥
प्राणायाम करुन ॥ संध्या आरंभावि पूर्ण ॥ शिखे तें गांठ देवोन ॥ ब्रह्मयज्ञ करावा ॥५॥
दर्भासन घालून ॥ त्यावरी संध्या करावी जाण ॥ गायत्री मंत्र जपून ॥ सप्तव्याह्रति पूर्वक ॥६॥
तीन वेळा तीन जपून ॥ त्यास म्हणावा प्राणायाम ॥ ऐशा प्राणायाम नित्यानी ॥७॥
हरी स्मरण करुनी ॥ तेणे नासती सर्व दोष ॥८॥
संध्येचा महिमा पूर्ण ॥ मोठा ब्राह्मणासीच जाण ॥ इतरांपाप पूर्ण ॥ करितां नाश कुळाचा ॥९॥
ऐसी तीन वेळा धर्मा जाण ॥ अर्ध्यदान देऊन ॥ मग करावें तर्पण ॥ ऐसा महिमा संध्येचा ॥१०॥
संध्या झालीयावरी जाण ॥ मग देवाचे करावें पूजन ॥ महाविष्णु शालिग्राम ॥ पूजितां बहु पुण्य पैं ॥११॥
आधी करावें संध्याध्यान ॥ मग करावा ब्रह्मयज्ञ ॥ मग करावें तर्पण ॥ पितृयज्ञ त्या म्हणती ॥१२॥
मग नैवेद्य दाखवून ॥ नंतर वैश्वदेव करावा जाण ॥ यास म्हणती पंचयज्ञ ॥ त्रिकाळीं ब्राह्मणासी ॥१३॥
पंच यज्ञावांचून ॥ जो ब्राह्मण खाईल अन्न ॥ त्यासी इष्टेसमान ॥ ऐसें शास्त्र बोलतसे ॥१४॥
पूर्वेकडे बैसावें ॥ ब्राह्मणें भोजन करावें ॥ पंचप्राणाहुती घेऊन ॥ शिखाग्रंथी सोडावी ॥१५॥
भोजन झालीयावरी जाण ॥ मग करावें पुराण श्रवण ॥ सायंकाळी संध्याजाण ॥ पूर्वेस जाण करावी ॥१६॥
ऐसा हा ब्राह्मणाचा धर्म ॥ इतर करितां शतचूर्ण ॥ त्याचें कूळ होय भस्म ॥ क्षण एक न लागतां ॥१७॥
ऐसा हा धर्म पूर्ण ॥ पुरुषांनी आचरावा जाण ॥ स्त्रियांचेही धर्म पूर्ण ॥ पुढील अध्याय़ीं सांगेन ॥१८॥
इति श्रीस्कंद ब्रह्मोत्तरखंडे ॥ कोकिळामहात्म्य ॥ सप्तविंशतिंतमोऽध्याय: अध्याय ॥१८॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
॥ अध्याय २७ वा समाप्त: ॥
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती