✕
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
श्री दुर्गा देवी स्तोत्रम्
Webdunia
बुधवार, 6 ऑक्टोबर 2021 (16:58 IST)
श्री गणेशाय नमः|
नगरी प्रवेशले पंडुनंदन | तो देखिले दुर्गास्थान |
धर्मराजा करी स्तवन | जगदंबेचे तेधवा ||१||
जय जय दुर्गे भुवनेश्वरी | यशोदागर्भसंभवकुमारी |
इन्दिरारमणसहोदरी | नारायणी चंडीके अंबीके ||२||
जय जय जगदंबे भवानी | मूळप्रकृती प्रणवरुपिणी |
ब्रह्मानंदपददायिनी | चिद्विलासिनी जगदंबे ||३||
जय जय धराधरकुमारी | सौभाग्यगंगे त्रिपुरसुंदरी|
हेरंबजननी अंतरी |प्रवेशी तू अमुचिया ||४||
भक्तहृदयारविंद्रभ्रमरी | तुझिया कृपावलोकने निर्धारी |
अतिमूढ तो निगमार्थ करी | काव्यरचना अद्भुत ||५||
तुझिया आपंगते करून् | जन्मांधासी येती नयन् |
पांगुळ धावे पवनाहून | करी गमन त्वरेने ||६||
जन्माधाराभ्य जो मुका | होय वाचस्पतीसम बोलका |
तू स्वानंदसरोवरमराळिका | होसी भाविका सुप्रसन् ||७||
ब्रम्हानंदे आदि जननी | तव कृपेची नौका करुनी |
दुस्तर भवसिंधु लंघोनी | निवृत्ती तटा नेईजे ||८||
जय जय आदि कुमारीके | जय जय मूळपीठनायिके |
सकल सौभाग्यदायिके | जगदंबिके मूळप्रकृती ||९||
जय जय भर्गप्रियभवानी | भवनाशके भक्तवरदायिनी |
समुद्रकारके हिमनगनंदिनी | त्रिपुरसुंदरी महामाये ||१०||
जय आनंदकासारमराळिके | पद्मनयन दुरितकानन पावके |
त्रिविध ताप भवमोचके | सर्व व्यापके मृडानी ||११||
शिवमानस कनक लतिके | जय चातुर्य चंपक कलिके |
शुंभनिशुंभ दैत्यांतके | निजजनपालके अपर्णे ||१२||
तव मुखकमल शोभा देखोनी | इंदुबिंब गेले गळोनी |
ब्रम्हादिके बाळे तान्ही | स्वानंदसदनी नीजवीसी ||१३||
जीव शीव दोन्ही बालके | अंबे तुवा नीर्मीली कौतुके |
जीव तुझे स्वरुप नोळखे | म्हणोनी पडला आवर्ती ||१४||
शीव तुझे स्मरणी सावचित्त | म्हणोनी अंबे तो नित्यमुक्त |
स्वनंदपद हातासी येत् | कृपे तुझ्या जननीये ||१५||
मेळवुनी पंचभूतांचा मेळ् | तुवा रचिला ब्रह्माडगोळ |
इच्छा परतता तत्काळ | क्षणात निर्मूळ करीसी तू ||१६||
अनंतबालसूर्य श्रेणी | तव प्रभेमाजी गेल्या विरोनी |
सकल सौभाग्य शुभकल्याणी | रमा रमणे वरप्रदे ||१७||
शंबरारि रिपुवल्लभे | त्रैलोक्यनगरारंभस्तंभे |
आदिमाये आदिप्रभे | सकळारंभे मूळप्रकृती ||१८||
जय जय करुणामृतसरीते | निजभक्तपालके गुणभरीते |
अनंत ब्रह्मांडपालके कृपावंते | आदिमाये अपर्णे ||१९||
सच्चिदानंद प्रणवरुपिणी | चराचरजीव सकलव्यापिणी |
सर्गस्थित्यंतकारिणी | भवमोचनी महामाये ||२०||
ऐकोनी धर्मराजाचे स्तवन् | दुर्गादेवी झाली प्रसन्न |
म्हणे तव शत्रू संहारून् | रीज्यी स्थापीन धर्मा तू ते ||२१||
तुम्ही वास करावा येथे | प्रकटो नेदी जनाते |
शत्रू क्षय पावती तुमचे हाते | सुख अद्भुत तुम्हा होय ||२२||
तुवा जे केले स्तोत्रपठण् | हे जो करील पठण श्रवण ||
त्यासी सर्वदा रक्षीन् | अंतर्बाह्य निजांगे||२३||
इति श्री दुर्गास्तोत्र समाप्त
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
नवरात्र पूजा साहित्य आणि 'षोडशोपचार पूजन विधी'
दुर्गा माता सिंहाची स्वारी का करते, त्यामागची कहाणी जाणून घ्या
Navratri 2021 घटस्थापना शुभ मुहूर्त, यंदा 8 दिवस असेल शारदीय नवरात्र
आदिशक्तीचा करा जागर,आलें नवरात्र
नवरात्र सांयकाळची पूजा
सर्व पहा
नवीन
पंच कैलास कुठे आहे? जाणून घ्या
आरती सोमवारची
सोमवारी या उपयांनी मिळेल तन, मन आणि धनाचे सुख
रविवारची आरती.... जयदेव जयदेव जय (श्री) म्हाळसापती
Surya Dev Mantra: सूर्याच्या 7 शक्तिशाली मंत्र जपल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, रविवारी कोणत्याही एका मंत्राचा जप करा
सर्व पहा
नक्की वाचा
या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या
अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?
माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या
दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते
भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल
पुढील लेख
नवरात्र पूजा साहित्य आणि 'षोडशोपचार पूजन विधी'