हळ्द, कुंकू, सिंदूर, काजळ, गंध, आंब्याची पाच पाने, आंब्याच्या पाच पानांचा टहाळा, कापूर, धूप, उदबत्ती, कुंकुममिश्रित अक्षता, विड्याची पाने, सुपार्या, खोबर्याची वाटी, गूळ, ५ नारळ, ५ खारका, ५ बदाम, साखर, फुले, तांबडी फुले, झेंडूची फुले, गुलाब, तांबडे कमळ, दूर्वा, दूर्वाग्म (दूर्वाची जुडी), शमी, बेल, तुळस, पाच फळे, केळी, दूध, दही, तूप, साखर, मध हे पाच पदार्थ पंचामृतासाठी. दोन कापासाची वस्त्रे, चंदन.
देवीसाठी चोळी, मंगळसूत्र, हिरव्या बांगडया, पळी पंचपात्र, तीर्थासाठी भांडे, 3 पाट, शंख, घंटा, निरांजन, समई, वाती, कापूरारती, धूपारती, उदबत्तीचे घर, नंदादीप, सुंगंधी द्रव्ये, सुटी नाणी, गोडतेल, तुप-वाती निरांजनासाठी, फुलांचा हार, 2 पाण्याने भरलेले कलश, कलशावर ठेवण्यासाठी दोन ताम्हण, कलशात टाकण्यासाठी वारुळ, गोठण इत्यादी पवित्र ठिकाणची माती, कलशात टाकण्यासाठी हळद, आंबेहळद, नागरमोथा इत्यादी औषधी द्र्व्ये, कलशावर ठेवण्याकरिता पाच आंब्याची पाने, त्यावर नारळ, देवीला नैवेद्यासाठी नारळाचे चूर्ण, साखर, दूध आणि महानैवेद्य.
हवनासाठी
यज्ञकुंडासाठी चार विटा, चार पाट, तांदूळ 1 किलो, 2 कलश पाण्याने भरलेले, त्यावर ठेवण्याकरिता दोन ताम्हण,
पाच प्रकारची फळे, खारीक,बदाम, खोबरे, गूळ, 20 सुपार्या, विडयाची पाने, फुले, आंब्याची पाने, गणपतीची मूर्ती, देवीची मूर्ती, गुरुजींना देण्याकरिता चांदीची गायीची मूर्ती व वस्त्रे. शिवाय लाकूड, तूप, लोणी, चंदनाची व आंब्याची वृक्षाची काष्ठे, भात, सातू, तीळ, समिधा, उसाचे तुकडे, सुगंधी पुष्पे, दूर्वा, गोमूत्र, पंचगव्य, पांढरी मोहरी, रुपयांची नाणे, कोहळा इत्यादी. दारावर लावण्यासाठी झेंडूचे तोरण, होमासाठी नैवेद्य. रुजवणासाठी लाल माती भरलेली एक परडी, नऊ प्रकारची धान्ये.
देवी पूजन विधी
महाकाली-महालक्ष्मी - महासरस्वती या त्रिशक्ती सोबत दुर्गा देवीची पूजा करण्याची प्रथा आहे. या पूजाविधीत कुलाचारांना प्राधान्य असते.
आश्विन शुध्द प्रतिपदेस घरात अत्यंत शुचिर्भूत अशा जागी घटस्थापना करावी. एका तांब्याच्या कलशावर ताम्हण ठेवून त्यात मंडलाकार मुख्य देवता महाकाली-महालक्ष्मी - महासरस्वती यांची व त्याच्या कुटुंब देवतांची स्थापना करावी.
एक तांब्याचा कलश शुध्द पाण्याने भरून त्यात सुगंधी द्रव्ये, सव्वा रुपया व सुपारी घालावी. कलशाच्या मुखावर पाच आंब्याची पाने व मध्यभागी नारळ ठेवावा. या कलशाच्या पायथ्याशी एका परडीत लाल माती टाकून त्यामध्ये नऊ प्रकारची धान्ये पेरावी. या पेरलेल्या धान्यावर दररोज पाणी शिंपडावे.
या रुजवणाच्या एका बाजूला घंटा, दुसर्या बाजूला शंख मधोमध निरांजन प्रज्वलित करुन ठेवावं. देवीसमोर नंदादीप नऊ दिवस अखंड पेटत ठेवावा. कलशाला पुष्पहार घालावा. कलशावर झेंडूच्या फुलांची माळ सोडावी. घराच्या मुख्य दारावर झेंडूच्या फुलांचे तोरण बांधावे.
नवीन रेशमी वस्त्र नेसुन पूजेच्या वेळी सर्व पूजासाहित्य जवळच ठेवून पाटावर बसावे. तेलवात घातलेली समई प्रज्वलित करावी. स्वत:ला कुंकू लावून पूजेला आरंभ करावा.
आचमन -
दोनदा आचमन करावे. भगवान श्रीविष्णूच्या 24 नावांपैकी पहिली तीन नावे उच्चारुन एकेक आचमन करावे-
त्यानंतर हात धुऊन चौथ्या नावापासून पुढील नावे हात जोडून म्हणावीत-
ॐ केशवाय नम: ।
ॐ नारायणाय नम: ।
ॐ माधवाय नम: ।
ॐ गोविंदाय नम: ।
ॐ विष्णवे नम: ।
ॐ मधुसूदनाय नम: ।
ॐ त्रिविस्र्माय नम: ।
ॐ वामनाय नम: ।
ॐ श्रीधराय नम: ।
ॐ हृषीकेशाय नम: ।
ॐ पद्मनाभाय नम: ।
ॐ दामोदराय नम: ।
ॐ संकर्षणाय नम:।
ॐ वासुदेवाय नम: ।
ॐ प्रद्युम्नाय नम: ।
ॐ अनिरुध्दाय नम: ।
ॐ पुरुषोत्तमाय नम: ।
ॐ अधोक्षजाय नम: ।
ॐ नारसिंहाय नम: ।
ॐ अच्युताय नम: ।
ॐ जनार्दनाय नम: ।
ॐ उपेन्द्राय नम: ।
ॐ हरये नम: ।
ॐ श्रीकृष्णाय नम: ।
प्राणायाम -
प्राणायाम करताना म्हणावे -
ॐ प्रणवस्य परब्रम्ह ऋषि। परमात्मा देवता । दैवी गायत्री छंद: । गायत्र्या गाथिनो विश्वामित्र ऋषि : । सविता देवता ।
असे म्हणून उजव्या हाताने ताम्हनात पळीभर पाणी सोडावे.
श्रीमहागणपति पूजन -
श्रीगणपतीचे प्रतीक म्हणून तांदुळ किंवा गहू यांच्या छोट्याशा राशीवर नारळ किंवा सुपारी ठेवावी किंवा श्रीगणपतीची छोटीशी मूर्ती ठेवावी त्यावर गंध, अक्षता इ फु्ले वाहून पूजा करावी.
गणपतीवर अक्षता वाहाव्या. नंतर आसन - अर्ध्य इत्यादी उअपचार अर्पण करावे. दोन पानांवर सुपारी ठेवून दक्षिणा अर्पण करावी. गणपतीची पूजा पूर्ण झाल्यावर
'कार्य मे सिध्दिमायातु प्रसन्ने त्वयि धातारि । विघ्नानि नाशमायान्तु सर्वाणि सुरनाय । ' अशी प्रार्थना करावी आणि ' श्रीमहागणपतये नमो नम: ।' असे म्हणून हात जोडावे.
आसन व वातावरणशुध्दी
ॐ पृथ्वी त्वया धृता लोका देवि त्वं विष्णुनां धृता । त्वं च धारण मां देवि पवित्र कुरु चासनं ॥१॥
घटस्थापना करावयाच्या जागी वर लहानशी मंडपी आंब्याचे डहाळे वगैरें नीट सुशोभित अशी तयार करतात.
या मंडपीला देवतास्वरूपी मानून तिची पूजा करतात.
श्री मंडपदेवतायै नमः । गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ॥
(मंडपाला गंध, अक्षता, फुले वाहावी.)
प्रोक्षण -
अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थां गतोऽपि वा । यः स्मरेत् पुंडरीकाक्षं सबाह्याभ्यंतरः शुचिः ॥
स्वतःच्या मस्तकावर व पूजासाहित्यावर तुलसीपत्राने किंवा फुलाने पाणी शिंपडावे.
घटस्थापना-
आपल्या घरात कुलदेवतेच्या किंवा नित्य पूजेच्या देवांच्या उजव्या बाजूस तांबडया मातीची वेदी तयार करावी. त्यावर कलश ठेवण्यापूर्वी प्रथम वेदीची प्रार्थना करताना म्हणावे-
असे म्हणावे. त्या कलशाला गंध, अक्षता, फूल वाहावे. नंतर त्या ताम्हनावर देवीची मूर्ती किंवा आपल्या कुलदेवतेची मूर्ती ठेवावी. म्हणजे देवतास्थापन पूर्ण झाले.
अंकुरारोपण -
घटस्थापना झाल्यावर त्या घटाभोवती तांबडी माती पसरावी. त्या मातीत नवधान्य, भात, गहू, जोंधळे, मका, मूग, हरभरे इत्यादी पेरावे. त्यावर पुनः माती पसरावी आणि म्हणावे -
हा मंत्र म्हणावा व ज्या जागी हा दीप ठेवायचा त्या स्थलाची गंध, अक्षता, फूल वाहून पूजा करावी. नंतर समई किंवा नंदादीपाची गंध, अक्षता, फूल वाहून पूजा करावी व म्हणावे-