Shardiya Navratri 2021 शारदीय नवरात्र घट स्थापना शुभ मुहूर्त

शनिवार, 2 ऑक्टोबर 2021 (08:24 IST)
अश्विन महिन्यात येणाऱ्या दुर्गा पूजेचा हा नऊ दिवसांचा सण शारदीय नवरात्र म्हणून ओळखला जातो. या दिवसांमध्ये देवी दुर्गाच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. यासाठी कलश स्थापन केली जाते आणि घरांमध्ये अखंड ज्योत प्रज्वलित केली जाते. प्रत्येक घरात परंपरेनुसार दररोज देवीला फुलांची माळ अर्पित करण्याची देखील पद्धत असते.
 
यावेळी शारदीय नवरात्र 7 ऑक्टोबर रोजी गुरुवारपासून सुरु होणार आहे आणि 15 ऑक्टोबर रोजी संपेल. दसऱ्याचा सण देखील याच दिवशी साजरा केला जाईल. कलश स्थापन करण्याच्या शुभ मुहूर्त जाणून घ्या.
 
कलश स्थापना शुभ मुहूर्त 
 
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घट म्हणजे कलश स्थापन केली जाते आणि या दिवशी अखंड ज्योत लावली जाते. यानंतर, हा कलश 9 दिवसांसाठी स्थापित राहतो. शेवटच्या दिवशी त्याचे विसर्जन केले जाते. 
 
यावेळी शारदीय नवरात्रीला कलश स्थापनेचा शुभ मुहूर्त सकाळी 9:33 ते सकाळी 11:31 पर्यंत असेल. 
दुपारी 3:33 ते संध्याकाळी 5:05 पर्यंत शुभ मुहूर्त असेल. 
 
यंदा देवी डोलीवर स्वार होऊन येत आहे: 
यावेळी नवरात्रोत्सवात देवी आई डोलीवर स्वार होऊन येतील. असे म्हटले जाते की जर नवरात्री सोमवार किंवा रविवारी सुरू झाली तर याचा अर्थ आई हत्तीवर स्वार होऊन येईल. शनिवार आणि मंगळवारी आई घोड्यावर स्वार होऊन येते. गुरुवारी किंवा शुक्रवारी नवरात्रीचा सण सुरू होतो तेव्हा आई डोलीवर स्वार होऊन येते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती