शौचालयातील पाण्याने बनवत होता चहा (व्हिडिओ)

Webdunia
दक्षिण मध्य रेल्वेने म्हटले की रेल्वेच्या शौचालयातील पाण्याने चहा बनवत असल्याचा व्हिडिओ समोर आल्यावर रेल्वने ने एका वेंडरला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
 
काही दिवसांपासून सोशल मीडियावर ट्रेनमधील एक व्हिडीओ बराच व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ट्रेनमधील कर्मचारी तेथील शौचालयातून चहा / कॉफीचे डबे बाहेर घेऊन जाताना दिसत आहे. ज्याने कळून येतं की त्या डब्यांमध्ये शौचालयातील पाणी भरले जात होते. 
 
याप्रकरणाची तपासणी केल्यावर कळून आले की हा व्हिडिओ मागील वर्षी डिसेंबरमधील असून ही घटना सिकंदराबाद रेल्वे स्टेशनवर चेन्नई सेंट्रल-हैदराबाद चारमिनार एक्सप्रेसमधील होती.
 
याप्रकरणी वेंडिंग कंत्राटदार पी शिवप्रसाद याच्यावर कठोर कारवाई करण्यात आली आहे.' अशी माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी एम उमाशंकर यांनी दिली. 

संबंधित माहिती

पुढील लेख