इतक्या गंभीर झटक्यातून सही सलामत बाहेर पडणं ही किमया आहे असे डॉक्टरांचं मत असल्याची माहिती त्यांनी शेअर केली आहे. चाहत्यांच्या प्रेमामुळे, शुभार्शिवादामुळे मी बचावले. गणेशाची माझ्यावर कृपा आहे. त्यामुळे लवकरच या आजारातून बाहेर पडेन असेही दारूवाला यांनी म्हटले आहे. आता बेजान दारूवाला यांच्या पोस्टवर अनेक चाहत्यांनी त्यांच्या प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा व्हावी म्हणून शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.