राहुल गांधींना राजपथावर सहाव्या रांगेत स्थान, झाले नाराज

Webdunia
शनिवार, 27 जानेवारी 2018 (09:43 IST)
प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या राजपथावर झालेल्या संचलनाच्या वेळी राहुल गांधी यांना सहाव्या रांगेत स्थान देण्यात आल्याने काँग्रेस नेत्यांमधून नाराजीचा सुरु उमटला.
 
सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्षा असताना त्यांनाही नेहमी पहिल्या रांगेत स्थान असायचं. मात्र राहुल गांधींना सहाव्या रांगेत बसवून मोदी सरकार हीन राजकारण करत असल्याचा आरोप काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे.
 
विशेष म्हणजे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह तसंच भाजपचे अनेक केंद्रीय मंत्री मात्र पुढच्या रांगेत बसले होते. तर राहुल गांधींना मात्र सहाव्या रांगेत बसावे लागले.

संबंधित माहिती

पुढील लेख