Prime Minister Narendra Modi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. त्यांच्या प्रेरणेमुळेच आज देश सामाजिक न्यायाचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्नशील आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला. त्यांच्या x हँडलवरील पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले की, सर्व देशवासीयांच्या वतीने, भारतरत्न आदरणीय बाबासाहेबांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम.