मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र भाजप अध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टपणे सांगितले की, भाजपमध्ये असा कोणताही नियम नाही की एखाद्या व्यक्तीने वयाच्या ७५ व्या वर्षी निवृत्त व्हावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवृत्तीचा प्रश्न आहे तो देशातील जनताच ठरवेल. पंतप्रधान मोदी स्वतः निर्णय घेतील. हे संजय राऊत कोण आहे हे ठरवणारे? पत्रकारांशी बोलताना महसूल मंत्री बावनकुळे यांनी उद्धव सेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांचा दावा फेटाळून लावला की मोदींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर येथील मुख्यालयात जाऊन पंतप्रधान मोदी निवृत्त होत असल्याची माहिती दिली. त्यांनी राऊत यांच्या विधानाला "राजकीय स्टंट" म्हटले. मंत्रिमंडळ बैठकीनंतर बावनकुळे म्हणाले की, भारतीय संविधानातही असे कोणतेही बंधन नाही. माजी भाजप नेते अटलबिहारी वाजपेयी हे वयाच्या ७९ व्या वर्षापर्यंत पंतप्रधान राहिले, तर मोरारजी देसाई (८३) आणि डॉ. मनमोहन सिंग (८१) यांनीही वयाच्या ७५ व्या वर्षानंतर हे पद भूषवले. पण, भाजपाप्रती असलेल्या त्यांच्या द्वेषभावनेमुळे डोळे बांधलेले राऊत हे विसरले आहे. निवडणूक जनादेश आणि जनतेच्या आशीर्वादावर अवलंबून असते. लोक कार्यकाळ ठरवतात. नरेंद्र मोदींचा पंतप्रधान म्हणून कार्यकाळ या देशातील जनता ठरवते, संजय राऊत किंवा विरोधी पक्षाला हा अधिकार नाही. पंतप्रधान मोदी यांनी २०४७ पर्यंत भारताला विकसित करण्याचे वचन दिले आहे. हा संकल्प त्यांच्या नेतृत्वाखालीच पूर्ण होईल. बावनकुळे म्हणाले की, भारतीय लोकशाहीमध्ये पंतप्रधानांचा कार्यकाळ हा राऊतसारख्या व्यक्तींकडून नव्हे तर जनतेच्या निवडणूक जनादेश आणि पाठिंब्याने ठरवला जातो.