मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी पूर्व महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात बस आणि एसयूव्हीच्या धडकेत पाच जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. खामगाव-शेगाव महामार्गावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) बसची बोलेरोशी टक्कर झाली, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. यानंतर काही वेळातच एका खाजगी बसने दोन्ही वाहनांना धडक दिली. खाजगी बसच्या पुढच्या केबिनचे मोठे नुकसान झाले आहे. खराब झालेल्या भागातून चालकाला वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहे.तसेच या भीषण अपघातात तर २४ हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.