'Shri Siddhivinayak Bhagyalakshmi Yojana' : महाराष्ट्रात मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी, राज्य सरकार आधीच माझी कन्या भाग्यश्री योजना चालवत आहे, ज्याअंतर्गत ५०,००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. तसेच आता माहिती समोर आली आहे की, श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजनाही सुरू करण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय महिला दिनी म्हणजेच ८ मार्च रोजी, श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टने महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या मुलींसाठी 'श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना' सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या मुलीच्या आईच्या बँक खात्यात १०,००० रुपये जमा केले जातील. ट्रस्टने या योजनेला मान्यता दिली आहे आणि ती सरकारच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आली आहे. सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर योजनेच्या अटी आणि शर्ती लवकरच जाहीर केल्या जातील. यावर्षी श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टच्या उत्पन्नात १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मंदिर ट्रस्टची एक महत्त्वाची बैठक झाली