Kashmir News: काश्मीरमध्ये वंदे भारत एक्सप्रेसचे आगमन ही केवळ रेल्वे सेवेची सुरुवात नाही तर ती कनेक्टिव्हिटी, विकास आणि नवीन संधींकडे एक पाऊल आहे. पंतप्रधान मोदींच्या या ऐतिहासिक उद्घाटनामुळे काश्मीरमधील लोकांना जलद आणि आधुनिक रेल्वे सेवेची भेट मिळेल, ज्यामुळे येणाऱ्या काळात पर्यटन आणि व्यवसायालाही चालना मिळेल.
तसेच काश्मीरच्या लोकांची दीर्घकाळची प्रतीक्षा आता संपणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ एप्रिल रोजी जम्मू-कटरा ते काश्मीर या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहे. हा ऐतिहासिक प्रसंग २७२ किमी लांबीच्या उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे प्रकल्पाच्या यशाचे प्रतीक असेल, जो अनेक वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर पूर्ण झाला आहे. ही रेल्वे सेवा काश्मीरमधील लोकांना देशाच्या इतर भागांशी जोडण्यासाठी मोठी सोय करेल.
जम्मू रेल्वे स्थानकावर सध्या दुरुस्तीचे काम सुरू आहे, त्यामुळे वंदे भारत ट्रेन कटरा येथून सुरू होईल. या ट्रेनची चाचणी आधीच यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे आणि रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी (CRS) याला हिरवा कंदील देखील दिला आहे. ही ट्रेन कटरा ते बारामुल्ला पर्यंत धावेल आणि या मार्गावर जलद, आरामदायी आणि आधुनिक रेल्वे सेवेची सुरुवात होईल.