100 अब्ज डॉलर्स संपत्ती असलेल्यांच्या यादीत मुकेश अंबानींचा समावेश

Webdunia
रविवार, 10 ऑक्टोबर 2021 (10:16 IST)
आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती असलेले मुकेश अंबानी यांचा आता 100 अब्ज डॉलर्सची संपत्ती असलेल्या अब्जाधीशांच्या यादीत समावेश झाला आहे.

टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अॅलन मस्क आणि अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस हे आघाडीवर असलेल्या या यादीमध्ये अंबानी यांचा 11 वा क्रमांक आहे.
 
मुकेश अंबानी यांच्या संपत्तीमध्ये गेल्या वर्षात 23.8 अब्ज डॉलर्सची भर पडली. त्यामुळं ताज्या आकडेवारीनुसार त्यांची संपत्ती 100.1 अब्ज डॉलर्स असल्याचं ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्समध्ये म्हटलं आहे.
 
या यादीत बिल गेट्स, लॅरी पेज, मार्क झुकरबर्ग अशा दिग्गजांचाही समावेश आहे. मुकेश अंबानी यांनी विविध क्षेत्रांतील कंपन्यांच्या माध्यमातून बाजारपेठेवर पकड मिळवत रिलायन्सला यशाच्या शिखरावर नेलं आहे.

संबंधित माहिती

पुढील लेख