20 वर्षीय मुलीवर लखनौ-मुंबई पुष्पक एक्सप्रेसमध्ये सामूहिक बलात्कार आणि दरोडा, पोलिसांनी चार आरोपींना पकडले

शनिवार, 9 ऑक्टोबर 2021 (11:50 IST)
लखनौ-मुंबई पुष्पक एक्सप्रेसमध्ये एका महिलेवर कथित सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र, अद्याप चार जण फरार आहेत. अन्य चार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास सात ते आठ दरोडेखोर अचानक लखनौ-मुंबई पुष्पक एक्सप्रेस ट्रेनमध्ये घुसले. सर्व दरोडेखोरांनी 15 ते 20 प्रवाशांना लुटले. आरोपींनी प्रवाशांकडून रोख रकमेसह मौल्यवान वस्तूही हिसकावल्या.
 
अचानक घडलेल्या या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रवाशांना लुटल्यानंतर दरोडेखोरांनी प्रथम ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या 20 वर्षीय महिलेशी गैरवर्तन केले. यानंतर गुन्हेगारांनी चालत्या ट्रेनमध्ये मुलीवर सामूहिक बलात्कार केला. घटनेनंतर गुन्हेगार घटनास्थळावरून पळून गेले. घटनेची माहिती मिळताच कल्याण जीआरपीने दरोडा आणि बलात्काराचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती