पंतप्रधान कार्यालयातून अण्णा हजारेंसाठी आला संदेश

शनिवार, 16 जून 2018 (15:38 IST)
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे सलग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विविध विषयांवर पत्र पाठवत राहीले. मात्र, २०१४ साली केंद्रात सत्तेवर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अण्णांच्या कुठल्याच पत्राला उत्तर दिलं नाही. पण आता ४ वर्षांत प्रथमच पंतप्रधान कार्यालयातून अण्णा हजारेंसाठी एक संदेश आला आहे.२०१४ पासून अण्णा हजारेंनी पंतप्रधान मोदींना १५ पत्र लिहिली आहेत.
 
लोकसभा निवडणुकीत आश्वासन देऊनही सरकारने गेल्या चार वर्षांत लोकपाल आणि लोकायुक्ताची नियुक्ती केली नाही. यासोबतच शेतकऱ्यांना हमीभाव, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी केली नसल्याने अण्णा हजारेंनी पुन्हा एकदा आंदोलन केलं. आठवडाभर चाललेल्या आंदोलनाला संपवण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी राज्यमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांना पुढाकार घ्यावा लागला होता. त्यानंतर अण्णा हजारे यांनी आपलं आंदोलन स्थगित केलं होतं. मात्र, ३० मार्च पासून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत केंद्र सरकारकडून कुठलाच सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने पुन्हा अण्णांनी सरकारला पत्र लिहिलं. आता अण्णा हजारेंना भेटण्यासाठी पीएमओचे सचिव स्तराचे अधिकारी लवकरच राळेगणसिद्धीला पोहोचणार आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती