ताम्हण, पंचपात्र, निरांजन घासून लख्ख केलं तिने.....

शनिवार, 9 जून 2018 (10:55 IST)
ताम्हण, पंचपात्र, निरांजन घासून लख्ख केलं तिने.....
 
लहानशी रांगोळी काढली देवघरापुढे.....
 
साजूक 
तुपात भिजवलेली फुलवात निरांजनात ठेवताना थोडं अजून तुप घातलं..
 
नव्या सुगंधाची धुपकाडी लावली.....
 
चाफ्याची फुलं दिली शेजारच्या छोकरीने आणून ती पण ठेवली देवासमोर. ....
 
आणि मनोभावे हात जोडले.....
 
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे
हे नाथ नारायण वासुदेव
पद्म दामोदर विश्वनाथ 
भगवान विष्णू नमोस्तुते....
 
पुटपुटत राहिली. .....
 
कुणी तरी विचारलं आज काय विशेष. ....????ॉ
 
ती हसली...अन् म्हणाली 
 
आईने शिकवलंय सुख दारात आलं ना की त्याचं भरभरून स्वागत करावं.....
 
त्याला आंजारून गोंजारून सजवावं....
 
काजळतीट लावून आनंदाच्या झुल्यात झुलवावं सुखाला.....
 
""सुखालाही तुमच्याकडे आल्याचं समाधान व्हायला हवं....नि ते त्याला मिळालं , रमलं घरात सुख की मग मुरतं ते अणूरेणूत कणाकणात वास्तुच्या.....
 
सुख काय दुःख काय शेवटी पाहुणेच....!! 
 
जितकं जसं आदरातिथ्य कराल सुखाच तितकं ते रमेल,
परतून येईल ....""
 
ती पुन्हा गुणगुणयला लागली आणि 
वास्तु म्हणाली तथास्तु. ....
 
       II शुभ सकाळ II

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती