Assam News: भारतात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. भारताच्या ईशान्येकडील आसाम राज्याला भूकंपाचे धक्के बसले. शुक्रवारी आसाममधील कछार जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्र (NCS) नुसार, आसामच्या कछार जिल्ह्यात झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.2 इतकी होती.
मिळालेल्या माहितनुसार शुक्रवारी संध्याकाळी हा भूकंप झाला. कछार जिल्ह्यात झालेल्या भूकंपाचे केंद्रबिंदू जमिनीपासून २५ किलोमीटर खाली होते. भूकंपाच्या धक्क्यांच्या भीतीने लोक घरे आणि इमारतींमधून बाहेर पडले.
भूकंप ही पृथ्वीच्या पृष्ठभागावर घडणारी नैसर्गिक घटना आहे, जी प्रामुख्याने पृथ्वीच्या अंतर्गत रचनेत होणाऱ्या ताणतणाव आणि क्रियाकलापांमुळे होते. भारतात भूकंप होण्याचे मुख्य कारण हिमालयीन प्रदेशातील भू-घटकीय क्रियाकलाप आहे. तसेच उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर आणि ईशान्य भारत भूकंपाच्या बाबतीत संवेदनशील आहे.