एकाच कुटुंबातील चार जणांची निर्घृण हत्या

शनिवार, 23 नोव्हेंबर 2024 (16:43 IST)
Assam News : आसाममधील नागाव जिल्ह्यात एकाच कुटुंबातील तीन जणांसह चौघांची अज्ञातांनी हत्या केली. पोलिसांनी सांगितले की, शुक्रवारी लुखोवा गराजन भागातील जल जीवन मिशनच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या घरात अज्ञात हल्लेखोरांनी घुसून त्यांच्यावर आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर धारदार शस्त्राने वार केले.
 
मिळालेल्या माहितीनुसार या घटनेनंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. मृतांपैकी तीन जण एकाच कुटुंबातील असल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन नागाव जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दिले आहे.

Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती