स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती निमित्त शैक्षणिक संस्था प्रकोष्ठ आणि आदर्श शैक्षणिक समूह, नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित 'सावरकर एक गौरव गाथा' या ऑनलाईन कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील बोलत होते.या वेळी ते म्हणाले की, स्वातंत्रवीर विनायक दामोदर यांनी सामाजिक समतेसाठी कृती करून आपले थोर विचार मांडले.सध्या गरज आहे त्यांचे हे थोर विचार लोकांपर्यंत पोहोचण्याची.
ते म्हणाले की,अंदमानच्या तुरुंगवास भोगल्यावर त्यातून सुटका झाल्यावर रत्नागिरीत वास्तव्यास असताना त्यांनी सामाजिक सुधारणांची अनेक ऐतिहासिक कार्ये केली.समाजातील चुकीचा रूढीवाद आणि परंपरेवर आळा घातला.जातीभेद,स्त्रीपुरुष भेद सारखे चुकीचे कायदे मोडले आणि सामाजिक समतेचा विचारांचा प्रसार केला.
त्यांनी जातीवाद संपवून विविध जातीच्या लोकांसाठी सहभोजने केली.सर्व जाती धर्माच्या लोकांना मंदिरात प्रवेश मिळावे म्हणून पतित पावन मंदिरे स्थापित केले.सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वामुळे आपण प्रभावित आहोत,असे पाटील म्हणाले. त्यांनी या वेळी त्यांनी सावरकरांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.
या वेळी कार्यक्रमाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर, प्रकोष्ठचे संयोजक अमित कुलकर्णी,सहसंयोजक व आदर्श शैक्षणिक संस्था पनवेल या संस्थेचे प्रमुख विसपुते,सहसंयोजक भारत खराटे आणि स्वरदा फडणीस उपस्थित होते.