घराच्या दुरुस्तीसाठी ५० हजारांची लाच स्वीकारताना आरे दूध डेअरीचा मुख्य कार्यकारी अधिकारी नथू विठ्ठल राठोड याला लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (एसीबी) सोमवारी (२४ मे) रंगेहाथ पकडले. एसीबीने त्याला अटक केली आहे. मंगळवारी (२५ मे) एसीबीने त्याच्या घराची झाडाझडती घेतल्यावर ३ कोटी ४६ लाख रुपयांची रोकड आढळली आहे. राठोड याच्या नातेवाईकांच्या मालमत्तेबाबतही एसीबी तपास करत आहे.
तिवारीने अर्जदाराकडे ५० हजारांची मागणी केली होती. तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली होती. १४ मे पासूनच राठोड एसीबीच्या रडारवर होता. २४ मेस एसीबीने सापळा रचला. तक्रारदाराने पैसे देण्याची तयारी दाखवताच राठोडने तक्रारदाराला गोरेगाव दूध डेअरी कार्यालयात तिवारी याला भेटायला सांगितले. त्यावेळी एसीबीने राठोड याला लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली.