तिन्ही कंपन्यांनी स्पुटनिक व्ही लसीचा पुरवठा करण्याची तयारी दाखवली

मंगळवार, 25 मे 2021 (09:44 IST)
मुंबईत करोना तुटवडा पाहता महापालिकेनं १ कोटी लशींची जागतिक निविदा काढली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या परवानगीनंतर ही निविदा काढण्यात आली होती. मात्र निविदा काढल्यानंतर कुणीच रुची न दाखवल्याने कालावधी वाढवण्यात आला होता. आता मुंबईत करोना लशींचा पुरवठा करण्यासाठी रशियाची वैज्ञानिक संस्था असलेल्या आरडीआयएफकडून प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे.
 
मुंबई महानगरपालिकेनं ११ मे रोजी निविदा काढली होती. निविदेची तारीख २५ मे रोजी संपणार आहे. मात्र तत्पूर्वी तीन प्रस्ताव आले आहेत. यापैकी एक प्रस्ताव थेट रशियन डायरेक्टर इनव्हेस्टमेंट फंडकडून आला आहे. तर दोन प्रस्ताव इतर खासगी कंपन्यांकडून आले आहेत. तिन्ही कंपन्यांनी रशियाच्या स्टुटनिक व्ही लसीचा पुरवठा करण्याची तयारी दाखवली आहे.
 
रशियातील स्पुटनिक व्ही लशीला देशात परवानगी मिळाली आहे. त्यानंतर लसीकरणही सुरु झालं आहे. मुंबई महापालिका लस खरेदीवर ३०० ते ७०० कोटी रुपये खर्च करणार आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती