मुंबईत बहुचर्चित मेट्रो 2 ए आणि मेट्रो 7 मार्गावर मेट्रोच्या चाचणीला सुरुवात होणार आहे. या वर्षाअखेर दोन्ही मेट्रो सुरू करण्याचा MMRDA चा प्रयत्न असणार आहे. यामुळे पश्चिम उपनगरात रहाणाऱ्या लोकांना प्रवासी वाहतुकीसाठी एक चांगला पर्याय उपलब्ध होणार आहे. पश्चिम उपनगरीय रेल्वेच्या लोकलमधील गर्दी तर जीवघेणी आहे. असं असतांना पश्चिम उपनगरासाठी दोन मेट्रो मार्ग लवकरच सुरू होणार आहेत. येत्या 31 मेला मेट्रो 2 ए आणि मेट्रो 7 मार्गावर मेट्रोच्या चाचण्यांना सुरुवात होणार आहे.
18.589 किमी चा मार्ग, 17 मेट्रो स्थानके
प्रकल्प खर्च 6410 कोटी रुपये
मेट्रो 7 मार्ग - दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व
अत्यंत वर्दळीच्या पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार,
16.4 किमी चा मार्ग, 17 मेट्रो स्थानके
प्रकल्प खर्च 6208 कोटी रुपये
या मार्गावरील बहुतेक सर्व मेट्रो स्थानकांचे काम 80 टक्क्यांपेक्षा जास्त पूर्ण झाले असून आता ही मेट्रो स्थानके आता मेट्रोच्या प्रतीक्षेत आहेत. या मार्गावरील काही ठिकाणी OHE - overheads wire मधून 25,000KV क्षमतेचा विद्युत पुरवठा सुरू करत तपासला गेला आहे. येत्या 31 मे ला मेट्रो 2 A च्या दहिसर - कामराज नगर आणि चारकोप डेपो मार्गावर तर मेट्रो 7 च्या आरे ते दहिसर मार्गावर मेट्रोच्या चाचण्या घेण्यात येणार आहेत.