बघू कोण किती प्रामाणिक आहे ते?", असे ट्विट करत अशोक चव्हाण यांचा भाजपाला इशारा

शुक्रवार, 28 मे 2021 (16:07 IST)
मराठा आरक्षण प्रश्न सोडवण्यासाठी हातात हात घालून काम करण्याची गरज आहे. आम्ही आरक्षण मिळावे म्हणून प्रयत्न करत आहोत, तर भाजपा मोर्चे काढत आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर कोण किती प्रामाणिक आहे ते बघू, असा इशारा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष  अशोक चव्हाण यांनी दिला आहे.
 
यासंदर्भात अशोक चव्हाण यांनी ट्विट करून भाजपावर निशाणा साधला आहे. "मराठा आरक्षण टिकावे म्हणून महाविकास आघाडीने प्रयत्न सोडलेले नाहीत आणि ज्यांच्या काळात कायदा आला ती भाजपा मात्र प्रयत्न सोडून मोर्चांचे इशारे देते आहे. दोघांमधील फरक स्पष्ट आहे आणि हेतूही स्पष्ट आहे. हातात हात घालून काम केले तर अजूनही वेळ गेलेली नाही. बघू कोण किती प्रामाणिक आहे ते?", असे ट्विट करत अशोक चव्हाण यांनी भाजपाला एकप्रकारे इशारा दिला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती