तर लोकलच्या वेळा सर्वसामान्यांसाठी बदलण्यात येणार

सोमवार, 8 फेब्रुवारी 2021 (16:34 IST)
मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत आहे. कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली नाही तर येत्या १५ दिवसांत मुंबई लोकलच्या वेळा सर्वसामान्यांसाठी बदलण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना मुंबई लोकलमधून प्रवास करताना ठराविक वेळेचं बंधन नसेल. 
 
यासंदर्भात माध्यमांशी बोलताना सुरेश काकाणी यांनी असे सांगितले की, सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकलच्या वेळा बदलण्याबाबत येत्या १५ दिवसांत निर्णय घेण्यात येईल. दरम्यान, काही ठराविक वेळेत सर्वसामान्यांना मुंबई लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. परंतु दिलासादायक बाब म्हणजे सामान्यांसाठी लोकल सुरू होऊन आठवडा झाला असला तरी कोरोनाबाधितांमध्ये वाढ झालेली दिसत नाही. त्यामुळे कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली नसल्याने येत्या काही दिवसांत सर्वसामान्यांना लोकल प्रवासाच्या वेळा बदलणार येणार असल्याचेही सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केले आहे. 
 
लोकल सेवा सर्वसामान्य प्रवाशांना पूर्ण क्षमतेने सुरू करण्याच्या संदर्भात सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत, त्यामुळे टप्प्या-टप्प्याने लोकल सेवा सुरू करणार असल्याची माहिती सुरेश काकाणी यांनी दिली. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती