मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांचा इशारा - रात्रीच्या कर्फ्यूमध्ये फिरताना आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल

शनिवार, 27 मार्च 2021 (19:41 IST)
देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत कोरोनाचे (कोविड -19) वाढते प्रकरण लक्षात घेता आता शहरातील महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले की, 28 मार्च रोजी रात्री 10 किंवा 11 वाजेपासून रात्रीचे कर्फ्यू लागू केले जाऊ शकते. चार-पाच प्रकरणे आल्यानंतर आता संपूर्ण इमारतीला तसेच सोसायटीला सील करण्यात येईल . किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, मुंबईकर रात्री कर्फ्यू दरम्यान अनावश्यकपणे रस्त्यावर भटकताना आढळले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. रात्री कर्फ्यू दरम्यान रस्त्यावर बीएमसी मार्शल तैनात केले जातील. 
मुंबईचे महापौर म्हणाल्या की झोपडपट्टी आणि चाळींपेक्षा बहुमजली इमारतींमध्ये आपण जास्त प्रकरणे पहात आहोत. रात्री कर्फ्यू दरम्यान पब आणि हॉटेल बंद राहतील. केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडल्या जातील. 
 शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संक्रमणाची परिस्थिती लक्षात घेता 28 मार्चपासून संपूर्ण राज्यात रात्री कर्फ्यू जाहीर केला आहे. शुक्रवारी राज्यात 36,902 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. तर या काळात 112 कोरोना बाधितांनी आपले जीव गमावले आहेत. तर  कोरोनाचे 17,019 रुग्ण बरे झाले आहेत.  
 महाराष्ट्रात कोरोनाची एकूण 26,37,735 प्रकरणे समोर आली आहेत. आतापर्यंत 23,00,056 लोकांनी या साथीच्या रोगावर मत दिली आहे सध्या तब्बल  2,82,451 सक्रिय प्रकरणे आहेत. तथापि, 53,907 रूग्णांनीही आपला जीव गमावला आहे
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची परिस्थितीही अतिशय भयावह आहे. एका दिवसात कोरोनाची 5513 नवीन प्रकरणे एका दिवसात आढळून आली.कोरोना विषाणूंच्या वाढत्या प्रादुर्भावाला बघता लोकांनी यंदा होळीचा सण अतिशय साध्या पद्धतीने साजरा करावा आणि गर्दी टाळावी असे ही आवाहन केले आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती