मनसेकडून भोजपुरी भाषेत बॅनर्स , पक्षात सामील होण्याचे केले आवाहन

शुक्रवार, 26 मार्च 2021 (17:01 IST)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईच्या कांदिवली परिसरात भोजपुरी भाषेत बॅनर्स लावण्यात आले आहे. यात मनसेकडून उत्तर भारतीयांना साद घातली जात असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.  या बॅनर्सच्या माध्यमातून मनसेने उत्तर भारतीय मतदारांना पक्षात सामील होण्याचे आवाहन केले आहे. जय श्री राम … हिंदुत्व के सम्मान में “उत्तर भारतीय भी मनसे के साथ मैदान में, अशा ओळी या बॅनर्सवर पाहायला मिळत आहेत.
काही दिवसांपूर्वीच मनसेची सदस्य नोंदणी मोहीम सुरु झाली होती. यानंतर घाटकोपर परिसरात नागरिकांना पक्षात सामील होण्याचे आव्हान करण्यासाठी मनसेने गुजराती भाषेत बॅनर्स लावले होते. त्याचीही बरीच चर्चा रंगली होती.
 
मनसेच्या बॅनर्सवर काय लिहले आहे?
जय श्री राम …हिंदुत्व के सम्मान में “उत्तर भारतीय भी मनसे के साथ मैदान में,
महाराष्ट्र की उन्नति और हिंदुत्व की बुलंद आवाज…हर हिन्दू की लड़ाई लड़ने वाले योद्धा आपन हिन्दू जननायक श्री राजसाहेब ठाकरे के साथ पूरी ताकत के साथ जुडेके बा,
हमहू ई अभियान से जुडल बा, आप लोगन से बिनती करात बा, आप लोग भी ई मंगल अभियान से जुड़ जाई, और पूरे महाराष्ट्र के भगवा रंग में बदल देइ…..

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती