ठाण्यात प्रेमसंबंध तुटल्यानंतर प्रियकराने केले महिलेच्या मुलाचे अपहरण, आरोपीला अटक

बुधवार, 25 सप्टेंबर 2024 (09:46 IST)
ठाण्यात महिलेने एका व्यक्तीशी प्रेम संबंध तोडल्यावर महिलेच्या प्रियकराने महिलेच्या दोन वर्षाच्या मुलाचे अपहरण केल्याचे प्रकरण समोर आले आहे.आरोपी कॅब चालवतो.या प्रकरणात आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

आरोपीचे एका महिलेशी प्रेम संबंध होते. महिला विवाहित असून तिला दोन वर्षाचा मुलगा आहे. महिलेने आरोपीशी प्रेम संबंध तोडले त्याचा राग आरोपीला आला आणि त्याने घराच्या बाहेर मुलगा खेळत असताना पळवून नेले.नंतर मुलाला नवी मुंबईतील पनवेल भागात लपवून ठेवले. 

मुलाच्या कुटुंबीयांनी मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली असून पोलिसांनी मुलाचा शोध घेण्यासाठी दोन पथके तयार केली. मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे पोलिसांनी शोध मोहीम राबविली. नंतर आरोपी पर्यंत पोलीस पोहोचले आणि आरोपीला अटक करून मुलाची सुखरूप सुटका केली. 

आरोपीने पोलिसांना चौकशीत सांगितले की त्याचे प्रेम संबंध मुलाच्या आईशी होते. मात्र मुलाच्या आईने प्रेम संबंध तोडल्यावर त्याला राग आला आणि त्याने मुलाचे अपहरण केले.पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.  
Edited By - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती