व्हेजिटेबल खिमा Vegetable Keema

Webdunia
शनिवार, 18 फेब्रुवारी 2023 (20:03 IST)
साहित्य  : दीड कप किसलेला फ्लॉवर, अर्धा कप किसलेले गाजर, 1 कप उकडलेला मटार, 1 कांदा, 1-1 चमचे आले-लसूण पेस्ट, 1 मोठा टोमॅटो, मीठ, तिखट, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धने-जिरेपूड, अर्धा कप दही, थोडे काजू तुकडे, किसमिस, कोथिंबीर.
 
कृती : कांदा-टोमॅटो बारीक चिरून घ्या. थोडे तेल गरम करून किसलेला फ्लॉवर व गाजर परतून घ्या. रंग बदलला की गॅस बंद करा. थोडे तेल गरम करून, कांदा लाल करा. आले-लसूण पेस्ट, टोमॅटो, सर्व मसाले घाला. दही घुसळून घाला. परतलेला फ्लॉवरचा, गाजराचा कीस घाला. उकडलेला मटार घाला. मीठ. थोडी साखर घाला. थोडे बेदाणे भाजीत घाला. वर काजू, कोथिंबीर पेरा.

संबंधित माहिती

पुढील लेख