Carrot marmalade गाजराचा मुरंबा

सोमवार, 23 जानेवारी 2023 (23:01 IST)
साहित्य : सात ते आठ लाल गाजरे, गाजराच्या फोडीं इतकी साखर, वेलदोडे, दोन लिंबे, चुन्याची निवळी व तुरटी.
 
कृती : गाजरे सोलून त्यांचे तुकडे करावेत. नंतर ते तुकडे पाणी, चुन्याची निवळी व तुरटी यांच्या मिश्रणात एक दिवस बुडवून ठेवावेत. नंतर ते साध्या पाण्यात शिजवून घ्यावेत. नरम होईपर्यंत शिजवावेत. नंतर फडक्यावर दोन ते तीन तास पसरून ठेवावेत. 
 
नंतर गाळून घेतलेले पाणी एका भांड्यात घेऊन, ते भांडे विस्तवावर ठेवावे व त्यात साखर घालून साखरेचा पक्का पाक करावा. नंतर त्यात गाजराचे तुकडे घालून, पाक पुन्हा दाट होईपर्यंत शिजवावे. खाली उतरवून वेलदोड्यांची पूड घालावी व गार झाल्यावर लिंबाचा रस घालावा. हा मुरंबा साधारणपणे महिनाभर टिकतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती