Veg Recipe : पालक-वालपापडी पुलाव

बुधवार, 8 फेब्रुवारी 2023 (15:27 IST)
साहित्य - एक जुडी पालक, पाव किलो वालपापडी, एक वाटी मटारदाणे, तीन वाटी बासमती तांदूळ, मीठ, तेल, लवंग, दालचिनी, तमालपत्र, मसाला वेलची, काळीमिरी, गोडा मसाला, हिंग, हळद, किसलेलं पनीर आणि कोथिंबीर.
 
कृती - सर्वप्रथम पालक निवडून धुवून थोडा वाफवून घ्यावा. पातेल्यात तेल तापवून हिंग, हळद व अख्खा मसाला फोडणीत घालावा. त्यावर गोडा मसाला परतून वालपापडीचे तुकडे व मटार टाकून थोडे परतावे. धुतलेले तांदूळ पातेल्यात टाकून परतावे. वाफवलेला पालक मिक्सरमधून वाटून घ्यावा, त्यात गरजेनुसार पाणी घालून ते भातावर घालावं. मिश्रणाला चांगली उकळी आल्यावर भात मंद आचेवर शिजवावा. नंतर मीठ घालून अलगद ढवळावा. भात शिजल्यावर त्यावर किसलेलं पनीर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर भातावर पसरावी.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती