थंड हवामानात न्याहारीसाठी बनवा गरम कोबी-मटार पराठे

गुरूवार, 7 जानेवारी 2021 (12:39 IST)
हिवाळ्यात ताजी कोबी आणि हिरवे मटारचे पराठे चविष्टच लागत नाही तर ते पौष्टिक देखील असतात. हे लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वाना आवडतात. चटणी किंवा दह्यासह खाल्ल्याने ह्याची चव दुपटीने वाढते. टिफिन साठी देखील हे योग्य आहे. हे बनविण्याच्या पूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवा म्हणजे हे पराठे थंड झाल्यावर देखील चांगले बनतील. 
 
साहित्य- 
4 कप किसलेली कोबी, दीड कप दरीदरीत केलेले मटारचे दाणे, 1 उकडलेला बटाटा, 1 चमचा आलं, लसूण हिरव्या मिरची ची पेस्ट, अर्धा कप चिरलेली कोथिंबीर. मीठ चवीप्रमाणे, अर्धा चमचा जिरे, चिमूटभर हिंग, ¼ चमचा हळद, 3 कप गव्हाचं पीठ, तेल गरजेप्रमाणे, थोडंसं ओवा.  
 
कृती -
सर्वप्रथम कढईत 2 चमचे तेल गरम करून हिंग आणि जिरे घाला त्यामध्ये आलं-लसूण -हिरव्या मिरचीची पेस्ट घालून परतून घ्या. हळद मिसळा आता कोबी-मटार घालून मंद आचेवर परतून घ्या चवीपुरती मीठ घाला. कोबी नरम झाल्यावर बटाटा मॅश करून आचेवरून काढून कोथिंबीर मिसळा. या सारणाला थंड होण्यासाठी ठेवा. 
आता गव्हाच्या पिठात एक चमचा तेल, चिमूटभर मीठ आणि ओवा घालून मिसळा. लागत लागत पाणी घालून कणीक मळून घ्या स्वयंपाक तज्ज्ञ सांगतात की पराठे मऊ बनविण्यासाठी कणीक चांगल्या प्रकारे मळणे गरजेचे आहे. म्हणून कणीक थोडी मऊसर ठेवा. आता या कणकेची मोठी गोळी बनवा. ह्या गोळीला लाटून त्यामध्ये कोबी-मटारचे सारण भरा हलक्या हाताने बंद करून चारी कडून बंद करून लाटून घ्या तव्यावर दोन्ही बाजूने तेल किंवा तूप लावून सोनेरी रंग येई पर्यंत शेकून घ्या. गरम पराठे चटणी, दही किंवा ग्रेव्हीच्या भाजीसह सर्व्ह करा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती