साहित्य : 1 कप काजूची पूड, 5 - 6 मोठे चमचे साखर, 4 - 5 केशर काड्या, पाणी गरजेप्रमाणे, अर्धा चमचा वेलची पूड आणि चांदीचं वर्ख.
कृती : सर्वप्रथम एका कढईत पाणी, साखर आणि केशर काड्या घालाव्या. पाण्यात पूर्णपणे साखर विरघळून घ्यावी. आता यामध्ये वेलची पावडर टाका. मिश्रण घट्ट होई पर्यंत थोडं-थोडं करून काजूची पूड त्या घालून सतत एक सारखं ढवळत राहावं जेणे करून घट्ट गोळे न हो. चांगल्या प्रकारे मिसळून मंद आंचेवर शिजवावं.
आता या सारणाला थंड करण्यासाठी ठेवावं सारण थंड झाल्यावर एका ताटलीला तुपाचा हात लावावा आणि तयार झालेल्या सारणाला सर्वदूर एकसारखं पसरवून द्या त्या वरून चांदीचे वर्ख लावावे आणि आपल्या आवडीनुसार सुरीच्या साह्याने काजू कतली कापून घ्यावी. घरात सोप्या पद्धतीने तयार केलेल्या काजू कतलीचा देवाला नैवेद्य दाखवून सर्वाना सर्व्ह करा.