साहित्य : एक वाटी रताळ्याच्या कीस, पाऊण वाटी साखर, अर्धी वाटी ओले खोबरे, पाऊण लिटर दूध, वेलचीपूड, बेदाणे.
कृती : बारीक किसलेली रताळी दुधात घालून शिजत ठेवावीत. दूध जरा वेळ आटवावे. कीस मऊसर झाल्यावर त्यात साखर घालून ढवळावे. वेलचीपूढ, खोबरे घाला. बेदाणे घालावेत. ही रुचकर खीर शेवयांच्या खिरीप्रमाणे लागते.