जर तुम्ही तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळला असाल तर आज आपण असेच काही स्नॅक पाहणार आहोत जे फक्त दहा मिनिटांमध्ये तयार होईल. तसेच तुम्ही संध्याकाळच्या चहासोबत देखील खाऊ शकतात. ज्याचे नाव आहे मखाना भेळ. मखाणे तुम्ही खालले असतील. पण तुम्हाला माहित आहे का या माखण्यांपासून आपण भेळ देखील बनवू शकतो जी आरोग्याच्या दृष्टीने देखील चांगली आहे. तर चला लिहून घ्या रेसिपी मखाना भेळ.
साहित्य-
मखाने-3 कप
अमचूर पूड- 1 छोटा चमचा
लाल तिखट- 1 छोटा चमचा
हळद - 1 छोटा चमचा
भाजलेले शेंगदाणे - 3 मोठे चमचे
टोमॅटो-1 बारीक कापलेला
हिरवी चटणी- 2 मोठे चमचे
चिंचेची चटणी- 1 मोठा चमचा
काकडी- 2 चमचे बारीक चिरलेली
सफरचंद - 2 चमचे चिरलेले
सेंधव मीठ - चवीनुसार
कृती-
एका पॅनमध्ये तेल घालून त्यामध्ये मखाने फ्राय करून घ्या. मखाने क्रिस्पी होइसपर्यंत फ्राय करावे. मखाने फ्राय करतांना त्यामध्ये हळद आणि अमचूर पूड घालावी. तसेच चवीनुसार मीठ घालावे. आता फ्राय केले मखाने थंड होऊ द्यावे.
यानंतर यामध्ये, शेंगदाणे, टोमॅटो. हिरव्या मिरचीचे तुकडे घालून चांगल्या प्रकारे मिक्स करावे. मग यामध्ये हिरवी चटणी आणि चिंचेची चटणी घालावी. नंतर यामध्ये काकडीचे आणि सफरचंदाचे तुकडे घालावे. तसेच तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यामध्ये इतर फळांचे तुकडे देखील घालू शकतात. तर चला तयार आपली मखाना भेळ. तुम्ही संध्याकाळच्या चहा सोबत देखी पाहू शकता.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.