बटाटयाच्या सालांपासून बनवा कुरकुरीत रेसिपी

मंगळवार, 23 जुलै 2024 (07:00 IST)
Potato peel recipe : बटाटा सोलल्यानंतर सर्वच जण बटाटयाचे साल फेकून देतात. पण तुम्हाला माहित आहे का? आपण या बटाटयाच्या सालापासून स्नॅक्स बनवू शकतो. आपण नेहमी भाज्यांच्या सालांना फेकून देतो. पण आपण या सालांपासून स्नॅक किंवा वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो. तसेच बटाटयाचे साल त्वचा, केस, आरोग्यासाठी चांगले असतात. तर चला जाणून घेऊ या बटाटयाच्या सालापासून बनणारी स्नॅक्स रेसिपी
 
साहित्य-
दोन कप बटाटयाचे साल 
एकी छोटा चमचा मिरे पूड 
एक चमचा कॉर्न फ्लोर
मीठ चवीनुसार  
एक चमचा तिखट 
तेल  
एक छोटा चमचा ओरेगेनो
 
कृती-
बटाटाच्या सालापासून स्नॅक्स बनवण्यासाठी बटाटा धुवून त्याचे साल काढून घ्या. यानंतर बटाटयाचे साल वाळवून घ्यावे. आता वाळलेल्या सालांमध्ये एक चमचा कॉर्न फ्लोर टाकावे आणि हे चांगल्या प्रकारे मिक्स करावे. यानंतर कढईमध्ये तेल गरम करावे. 
 
तेल गरम झाल्यानंतर बटाटयाचे साल त्यामध्ये टाकून तळून घ्यावे. शैलो फ्राय केल्यानंतर एका प्लेटमध्ये काढावे. आता यावर मीठ, तिखट, ओरेगेनो आणि मिरे पूड घालावी. व चांगल्या प्रकारे मिक्स करावे.
 
आपले बटाटयाचे क्रिस्प किंवा स्नॅक्स बनून तयार आहे. तुम्ही यांना सॉस, चटणी किंवा संध्याकाळी चहा सोबत सर्व्ह करू शकतात.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती