Valentine's Day 2024 : व्हॅलेंटाईन डे साठी जोडीदारासाठी बनवा हा खास पिझ्झा

शनिवार, 10 फेब्रुवारी 2024 (07:00 IST)
जसजसा व्हॅलेंटाइन डे जवळ येतो तसतसे लोक त्यांच्या जोडीदारांसोबत वेळ घालवण्याचे नियोजन करू लागतात. या दिवशी लोक आपल्या जोडीदारासह बाहेर जातात. जोडीदारासाठी लंच आणि डिनर बनवतात. त्यांना छान वाटेल म्हणून खास काही करतात. चित्रपटाला नेतात. भेटवस्तू देतात. काही जोडपे असे असतात की त्यांना बाहेर जाण्यासाठी वेल्च नसतो. अशा परिस्थितीत आपल्या जोडीदारासाठी घरीच बनवा खास पिझ्झा.आपण वर्तुळाकारा ऐवजी बदामाचा आकार देखील देऊ शकता.  चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.
 
साहित्य -
पिझ्झा बेस-2
पिझ्झा सॉस - 3 चमचे
चीज - 2 चमचे
सिमला मिरची-1 चिरून
टोमॅटो - 1 चिरलेला
ओरेगॅनो - 1/2 टीस्पून
चिली फ्लेक्स - 1/2 टीस्पून
 
कृती- 
हार्ट शेपचा पिझ्झा बनवण्यासाठी आधी रेडीमेड पिझ्झा बेस घ्या. आता ते हृदयाच्या आकारात कापून घ्या. त्याचा आकार खूप लहान होणार नाही याची काळजी घ्या. यानंतर कांदा, टोमॅटो आणि सिमला मिरचीचे समान तुकडे करून घ्या.
आता सर्व प्रथम पिझ्झा सॉस घाला आणि या बेसवर चांगले पसरवा. यानंतर त्यावर चिरलेला कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, स्वीट कॉर्न इत्यादी टाका. यासोबतच जोडीदाराच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या वाढवू किंवा कमी करू शकता.
 
आता पिझ्झावर शेवटी किसलेले चीज घाला. हा पिझ्झा ओव्हनमध्ये 20 मिनिटे शिजवा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ओरेगॅनोनेही सजवू शकता. जर तुमच्या जोडीदाराला केचप आवडत असेल तर तो पिझ्झासोबत नक्कीच सर्व्ह करा. 
 
Edited By- Priya Dixit   
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती