स्ट्रॉबेरी केक बनवण्यासाठी सगळ्यात आधी दुधात सिरका मिक्स करा. मैदयामध्ये मीठ, कोको, बेकिंग पावडर आणि साखर टाकून ते चाळने. वितळलेले लोणी आणि सिरका मिसळलेले दूध हे मिश्रण दोन मिनिट फेटा. आता एसेंस, दूध आणि क्रीम मिक्स करून दोन मिनिट फेटा. या मिश्रणाला दोन बरोबर भागात घेऊन बटर पेपरवर लावलेल्या बेकिंग ट्रे मध्ये टाकून 180 डि.सें. तपमान वर 30 ते 35 मिनिट बेक करणे. नंतर यात सूरी टाकून बघणे जर मिश्रण सुरीला चिटकले नाही तर समजा केक तयार झाला आहे. केक थंड झाल्यानंतर त्याला काढून घ्या केकच्या एक भागाला क्रीम लावा त्यावर तुमच्या आवाडीनुसार कापलेली स्ट्रॉबेरी सजवा. केकचा दूसरा भाग यावर ठेवणे. क्रीम आणि स्ट्रॉबेरीने केकच्या दुसऱ्या भागाला सजवून स्ट्रॉबेरी कोको केक वेलेंटाइन डे स्पेशल तुमच्या जोडीदाराला दया.