भारतात प्रत्येक घरात खिचडी बनते व खिचडी सर्वांना आवडते. नेहमी असे पाहिला मिळते की लोक दिवासा जेव्हा पोट भरून जेवण करतात. तर रात्री त्यांना हलके जेवण करावेसे वाटते. हलके जेवणात खिचडी हा एक असा ऑप्शन आहे. खिचडी खातांना पण चविष्ट लागते आणि पटकन बनते. खूप ठिकाणी खिचडी साधी बनवतात. काठियावाडी खिचडीची रेसिपी जाणून घ्या चला रेसिपी लिहून घ्या.
काठियावाडी खिचडी बनवण्यासाठी सगळ्यात आधी मूगडाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घ्या व पाण्यात भिजवून ठेवा. यानंतर बटाटा, कांदा, टोमॅटो यांचे छोटे-छोटे तुकडे करून घ्या. आता एक कूकर घेऊन त्यात भिजवलेले दाळ आणि तांदूळ टाका. सोबतच बटाटा, मटर, हळद आणि मिठ टाका.
जेवढे दाळ, तांदूळ तुम्ही घेतले आहे त्याच्या ४ पट पाणी टाका. व तीन ते चार शिट्टी घ्या. जेव्हा खिचडी शिजेल तेव्हा एका कढईत तेल गरम करून त्यात जीरे, लसूण, आले पेस्ट आणि हींग टाकून परतवा. मसाला चांगला परतवला गेला की त्यात कांदा, टोमॅटो, हिरवी मिर्ची, गरम मसाला टाकून हे मिश्रण परतवा. या मिश्रणात मग थोडे पाणी टाका. व छान शिजल्यावर यात आपण केलेली खिचडी टाका व २ ते ३ मिनिट शिजू दया. नंतर खिचडीवर चिरलेली हिरवी कोथिंबीर टाका. खिचडी सोबत तुम्ही चटनी, लोणचे, पापड सर्व्ह करू शकतात.