Lauki Dosa Recipe : मुलांना बनवून द्या लौकी चा चविष्ट डोसा, रेसिपी जाणून घ्या

शनिवार, 27 जानेवारी 2024 (15:44 IST)
Lauki Dosa Recipe : मुलांना काहीही खायला घालण्यात खूप त्रास होतो. मुलं कितीही मोठी झाली तरी खाण्याबाबत त्यांच्या मनात नेहमीच नाराजी असते. विशेषत: भाजीपाला. भाज्यांमध्ये देखील त्यांना काही विशिष्ट भाज्यांचं आवडतात. आवडीची भाजी ते आवडीने खातात. पण लौकी किंवा दुधी भोपळाची भाजी मुलांना अजिबात आवडत नाही. पण या लौकीचा डोसा बनवून दिल्यावर ते आवडीने खातील. चला तर मग रेसिपी जाणून घ्या. 
 
साहित्य-
1 मध्यम आकाराची, सोललेली आणि किसलेली लौकी किंवा दुधी भोपळा 
तांदळाचे पीठ : 1 वाटी
रवा: 1/4 कप
दही: 1/2 कप
हिरवी मिरची: 1 बारीक चिरलेली 
कोथिंबीर : 2 चमचे बारीक चिरलेली 
हळद पावडर: 1/4 टीस्पून
लाल तिखट पावडर: 1/4 टीस्पून 
मीठ: चवीनुसार
तेल: डोसा बनवण्यासाठी
पाणी : गरजेनुसार
 
कृती :
सर्वप्रथम दुधी भोपळा सोलून किसून घ्या. दुधी भोपळ्यात खूप पाणी असेल तर थोडे दाबून पाणी काढून टाकावे. आता एका मोठ्या भांड्यात किसलेला दुधी भोपळा, तांदळाचे पीठ, रवा, दही, हिरवी मिरची, कोथींबीर, हळद, तिखट आणि मीठ घालून चांगले मिक्स करा.
यानंतर थोडे थोडे पाणी घालून हे पीठ तयार करा. पिठाला 15-20 मिनिटे तसेच सोडा. यानंतर नॉनस्टिक डोसा तवा मध्यम आचेवर गरम करा आणि थोडे थोडे तेल लावा.
 
आता या पिठातून तव्यावर डोसा बनवा. जेव्हा ते सोनेरी आणि कुरकुरीत होते, तेव्हा ते उलटा आणि दुसऱ्या बाजूने देखील शिजवा. 
व्यवस्थित सोनेरी झाल्यावर बाहेर काढा. आता सर्व्हिंग प्लेटवर काढा आणि टोमॅटो चटणी किंवा नारळाच्या चटणीबरोबर सर्व्ह करा.

Edited By- Priya Dixit   
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती