19 मिलियन व्ह्यूज, यूजर्स भडकले कारण खराट्याने साफ करतोय डोसा तवा

गुरूवार, 16 नोव्हेंबर 2023 (17:09 IST)
Bangalore Dosa Viral Video डोसा हा सर्वात लोकप्रिय पदार्थांपैकी एक आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या स्टॉल्सपासून ते उत्तम जेवणाच्या रेस्टॉरंट्सपर्यंत, अनेक ठिकाणी या दक्षिण भारतीय पाककृतीला भरभरुन प्रतिसाद मिळतो. काही ठिकाणे विविध प्रकारचे डोसे बनवण्यात माहिर आहेत. अलीकडेच बेंगळुरूमधील अशाच एका रेस्टॉरंटचा व्हायरल व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. व्हिडिओ सुरुवातीपासून डोसा बनवण्याची प्रक्रिया दर्शविते आणि असे करताना लोकांना त्याच्या तयारीची झलक मिळते. हे पाहिल्यानंतर यूजर्समध्ये नाराजी पसरली आहे.
 
@Thefoodiebae च्या फेसबुक व्हिडिओत एका रेस्टॉरंटच्या ओपन किचनमध्ये एका मोठ्या पॅनसमोर एक आचारी दिसतो. त्यांच्या मागे ग्राहकांची गर्दी दिसत आहे, जे त्यांच्या ऑर्डरची आतुरतेने वाट पाहत आहेत. डोसा बनवण्यासाठी तो तवा तयार करू लागतो. तो त्यावर पाणी शिंपडतो आणि चक्क खराट्याने तवा साफ करायला जातो. गरम तव्यावरील पाण्याचे वाफेत रूपांतर होते आणि तो सतत वेगाने खराटा फिरवतो. यानंतर डोसा बनवण्यासाठी तो गोलाकार हालचालीत पिठात पसरवतो. एक तवा 12 डोसे बनवता येईल इतका मोठा आहे.
 
नंतर प्रत्येक डोश्यावर तूप सोडतो आणि मसाला टाकून डोसा तयार करुन केळीच्या पानांवर सर्व्ह करतो. कॅप्शनमध्ये लिहिले आहे- ""बंगलोरच्या सर्वात हाय-टेक डोसासाठी क्रेझी रश." खाली पूर्ण व्हिडिओ पहा:
 
व्हिडिओला आतापर्यंत 19 मिलियन व्ह्यूज आणि हजारो हजार लाईक्स मिळाले आहेत. मात्र कमेंट्स नापसंतीच्या प्रतिक्रियांनी भरलेले आहे. तवा पुसण्यासाठी खराट्याचा वापर करण्यावर अनेकांनी टीका केली आहे. इतरांना असे आढळले की डोसा बनवण्यासाठी वापरण्यात येणारे तूप/तेलाचे प्रमाण जास्त आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती