शिळ्या पोळ्या शिल्लक असतील तर-
1 पोळ्या कुरकुरीत होई पर्यंत तळून घ्या. या वर तिखट,मीठ,चाट मसाला, दही, चिंच गुळाची चटणी घालून सर्व्ह करा.
2 पोळ्या तळून घ्या आणि त्यावर मीठ, तिखट, आमसूल पूड घालून मसाला पोळी बनवा.
3 बटाट्याची भाजी आणि पोळी शिल्लक राहिली असल्यास पोळीला बटर लावून शेकून घ्या या वर बटाट्याची भाजी,बारीक चिरलेला कांदा आणि कोबी घालून फ्रॅन्की बनवा.
4 पोळ्यांना पिझ्झा सॉस, ढोबळी मिरची, कांदे,आणि चीझ घालून शेकून घ्या. चविष्ट पोळी पिझ्झा तयार.