साहित्य-
250 ग्रॅम भेंडी, 3 कांदे मध्यम आकाराचे काही कांदे चौरस तर काही बारीक चिरलेले, 1 मोठा टोमॅटो, 2 हिरव्या मिरच्या, 1 कांदा बारीक चिरलेला, 1 इंच आलं, 4 ते 5 पाकळ्या लसूण,1 मोठी वेलची ,जिरे, 1 तुकडा दालचिनी,1/2 चमचा तिखट,1/2 चमचा हळद,1 चमचा धणेपूड,1/2 चमचा गरम मसाला,1/2 चमचा आमसूलपूड, मीठ चवीप्रमाणे , 6 चमचे तेल.
कृती -
भेंडी दो प्याजा करण्यासाठी सर्वप्रथम भेंडी पाण्याने धुऊन स्वच्छ कपड्याने पुसून घ्या नंतर भेंडी मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून घ्या. टोमॅटो, आलं,लसूण बारीक वाटून घ्या.
आता पॅनमध्ये 3 चमचे तेल घालून गरम होण्यासाठी ठेवा त्यामध्ये जिरे,दालचिनीचा तुकडा,आणि मोठी वेलची घालून फोडणी तयार करा. बारीक चिरलेला कांदा, मध्यम आंचेवर सोनेरी रंग येई पर्यंत परतून घ्या.
नंतर या मध्ये टोमॅटो, आलं लसणाची पेस्ट आणि हिरवी मिरची घालून थोडं पाणी घाला . हळद,तिखट,धणेपूड,गरम मसाला,मीठ सर्व मसाले घालून परतून घ्या .मसाले चांगले परतून झाल्यावर भेंडी आणि कांदा घालून मसाल्यात मिसळा आणि मंद आचेवर भेंडी झाकून मऊ शिजवून घ्या.