किचन टिप्स : काही सोप्या किचन टिप्स जे आपल्या कामी येतात.

गुरूवार, 4 फेब्रुवारी 2021 (13:17 IST)
आपल्या घरी पाहुणे येणार आहे त्यासाठी पूर्व तयारी करून ठेवण्या सारखे काही सोपे टिप्स आहे. या मुळे आपण पाहुण्यांकडे चांगले लक्ष ठेवू शकता. 
 
 
* टोमॅटो मिक्सर मध्ये वाटून प्युरी बनवून डीप-फ्रीजर मध्ये ठेवा. हे आपण 15 दिवसापर्यंत वापरू शकता. 
 
* पालक उकळवून घ्या आणि मिक्सर मध्ये वाटून  डीप-फ्रीज मध्ये ठेवा. पालक पनीर बनविताना आपण ह्याचा वापर करू शकता.
 
* शेंगदाणे भाजून त्याचा कूट बनवून ठेवा. फराळाचं करताना आपला वेळ वाचेल.
 
* बटाटे उकडवून थंड करून घ्या. नंतर ह्यांना फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवा. हे आपण 3 ,4 दिवस वापरू शकता. 
 
* थोडं तेल गरम करून त्यामध्ये मोहरीचे दाणे, कडीपत्ता, काजू, शेंगदाणे, उडीद डाळ, घाला. या मध्ये रवा घालून तपकिरी रंग येई पर्यंत हलवा. चवीप्रमाणे मीठ आणि साखर मिसळा. थंड झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवा. जेव्हा कधी उपमा बनवायचा आहे तेव्हा पाणी उकळवून  घ्या . त्यामध्ये लिंबू पिळा आणि बनवा आपली इच्छा असेल तर साजूक तूप देखील मिसळू शकता.      
 
* भाज्यांना फ्रीज मध्ये ठेवण्यासाठी -त्यांना धुऊन घ्या, नंतर पुसून घ्या आणि प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून ठेवा. असं केल्यानं भाज्या लवकर खराब होणार नाही. 
 
* हिरव्या मिरच्या साठवून ठेवण्यासाठी त्यांच्या कांड्या काढून स्टोअर करून ठेवा.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती