चविष्ट रेसिपी - पनीर लॉलीपॉप

सोमवार, 8 फेब्रुवारी 2021 (17:06 IST)
पनीर लॉलीपॉप बनविण्यासाठी पनीर वापरले जाते. बटाटे आणि बरेच मसाले मिसळून बनविले जाणारे हे पनीर लॉलीपॉप सर्वांना आवडतील आणि पार्टीमध्ये देखील स्टार्टर म्हणून सर्व्ह करण्यासाठी हे उत्तम पर्याय असल्याचे सिद्ध होईल.हिरव्या चटणी सह सर्व करावे, आपल्या घरी अचानक पाहुणे आल्यावर चटकन बनवायला देखील हे खूप चांगले स्नॅक्स आहे.  चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.
 
साहित्य- 
1 कप पनीर, 2 बटाटे उकडलेले, 2 हिरव्या मिरच्या,1/2 ढोबळी मिरची बारीक चिरलेली, 1 बारीक चमचा आलं, 1 बारीक चमचा लसूण,1/2 लहान चमचा जिरेपूड,1/2 गरम मसाला ,1/2 लहान चमचा चाट मसाला, 1/4 कप कोथिंबीर,मीठ चवीप्रमाणे, 1/2 लहान चमचा तिखट,1 कप ब्रेडचे क्रम्ब्स, 1/2 कप मैदा. तेल तळण्यासाठी,टूथपिक     
 
 कृती -
सर्वप्रथम पनीर आणि उकडलेले बटाटे एका भांड्यात किसून घ्या.ढोबळी मिरची आणि सर्व मसाले एकत्र करून चांगल्या प्रकारे मिसळा. भाज्यांमध्ये सर्व साहित्याची चव येण्यासाठी 15 ते 20 मिनिटा साठी तसेच ठेवा. आता या मिश्रणाचे लहान लहान गोळे बनवून एकीकडे ठेवून द्या.
मैद्याचे घोळ बनविण्यासाठी पाणी घालून मिसळा आणि गुळगुळीत होईपर्यंत ढवळा. आता हे पनीरचे बॉल्स किंवा गोळे या मैद्याच्या घोळात बुडवून ब्रेडच्या क्रम्ब्स मध्ये घाला. कढईत तळण्यासाठी तेल घाला आणि तापल्यावर हे गोळे तेलात सोडा आणि कुरकुरीत तपकिरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्या. प्रत्येक बॉल मध्ये टूथपिक लावा आणि हिरव्या चटणी किंवा सॉस सह सर्व्ह करा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती