पण लोकसंख्या वाढू लागली तसे घराबाहेर असलेले मंदिर घराच्या आत आले. परंतु, वास्तुशास्त्रानुसार देवघर बांधताना त्याची दिशा व सजावट यांचा आधी विचार केला पाहिजे. त्याचे तसे नियोजन केले पाहिजे. त्यामुळे त्यापासून सकारात्मक लाभ होतात.
स्थळ : देवघर घरातील उत्तर-पूर्व दिशेच्या कोपर्यात असल्याने सुख, शांती, धन, संपत्ती व प्रसन्नता प्राप्त होते. देवघराच्या वरच्या मजल्यावर किंवा खालच्या मजल्यावर शौचालय अथवा स्वयंपाक घर नसावे. तसेच घरातील शिडीच्या खाली देखील देवघर बांधू नये. देवघर हे तळमजल्यावरच खुले व मोठे असायला पाहिजे.
देवाघरातील मूर्ती : देवघरात कमी वजनाच्या मूर्ती ठेवल्या पाहिजे. त्यांची दिशा पूर्व, पश्चिम, उत्तरमुखी असू शकते. मात्र, दक्षिणमुखी मुळीच नको. परमेश्वराचा चेहरा कुठल्याही वस्तूने अथवा फूल-माळांनी झाकता जाता कामा नये. तसेच परमेश्वराच्या मूर्ती भिंतीपासून साधारण एक इंचापर्यंत दूर ठेवल्या पाहिजेत. त्यांच्यासोबत आपल्या माता-पित्यांची छायाचित्रे देखील ठेवता कामा नये. भंगलेल्या मूर्ती देवघरातून काढून त्यांना नदीत विसर्जित केल्या पाहिजे.
इतर : धूप, अगरबत्ती व यज्ञकुंड देवघरात दक्षिण-पूर्व दिशेच्या कोपर्यात हवे. घरातील इतर वस्तू अथवा सौंदर्य प्रसाधने देवघरात ठेवू नये. पूर्व दिशेकडे तोंड करून पुजा केली पाहिजे. तसेच दागिने अथवा किंमती वस्तू देवघरात ठेवू नयेत.