Maharashtra Tourism : महाराष्ट्राला अनेक प्राचीन ऐतिहासिक वास्तूंचा वारसा लाभलेला आहे. तसेच यामध्ये प्राचीन मंदिरे यांचा देखील समेवश असून राज्यात अनेक प्राचीन मंदिरे आहे जी आज देखील इतिहासाची साक्ष देतात. तसेच महाराष्ट्रातील सोलापूर हे ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध शहर आहे, जे त्याच्या विविधता आणि परंपरांसाठी ओळखले जाते. येथील वास्तुकला आणि नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करते. असेच एक प्राचीन मंदिर महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. जे आज तेथील प्रसिद्ध मंदिर म्हणून ओळखले जाते. या मंदिरात भक्तांची गर्दी पाहावयास मिळते.
सिद्धेश्वर मंदिर सोलापूर
सिद्धेश्वर मंदिर हे सोलापूरच्या प्रमुख धार्मिक स्थळांपैकी एक आहे. हे मंदिरे भगवान शिवाला समर्पित आहे आणि दरवर्षी हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. मंदिर संकुलात असलेले तलाव त्याचे सौंदर्य वाढवते. मकर संक्रांतीच्या निमित्ताने येथे एक विशेष मेळा भरतो, ज्यामध्ये मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतात.तसेच श्रावणात या मंदिरात भक्तांची गर्दी देखील पाहावयास मिळते.
सिद्धेश्वर मंदिर वास्तुकला
सिद्धेश्वर मंदिराची वास्तुकला अद्वितीय आहे, ज्यामुळे ते पाहण्यासारखे आहे. या शिवमंदिरात ऋषी-ऋषी ध्यान आणि योग करत असत. असे सांगितले जाते की, सिद्धेश्वर शिवमंदिर मध्ययुगीन काळात बांधले गेले आहे. हे हेमाडपंथी शैलीत काळ्या दगडाने बांधलेले आहे. प्राचीन काळात येथे ऋषीमुनी ध्यान करत असत असे मानले जाते.
तसेच हे प्राचीन मंदिर सोलापूरपासून ४० किलोमीटर अंतरावर भीमा नदीच्या काठावर आहे. महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी या नदीच्या काठावर एक भव्य घाट बांधला. या नदीच्या मध्यभागी असलेले जटा शंकर महादेव पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर पाहता येते. पाण्याच्या मध्यभागी असल्याने हे मंदिर खूप आकर्षक दिसते. हे मंदिर त्याच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे पर्यटकांना आकर्षित करते. तसेच भीमा नदीला चंदभागा नदी म्हणून ओळखले जाते. श्रावण महिन्यात येथे संपूर्ण महिनाभर भाविक येत राहतात. याशिवाय महाशिवरात्रीलाही मोठ्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येतात. दरवर्षी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा इत्यादी राज्यांमधून मोठ्या संख्येने भाविक आणि पर्यटक येथे येतात.
सिद्धेश्वर मंदिर सोलापूर जावे कसे ?
सोलापूर हे महाराष्ट्रातील प्रमुख शहरांपैकी एक शहर असून हे अनेक शहरांना रस्ता मार्गाने जोडलेले आहे. तसेच रेल्वे मार्गाने देखील सोलापूर अनेक प्रमुख शहरांना जोडलेलं आहे. परिवहन महामंडळाची बस किंवा खासगी बसच्या मदतीने तुम्ही शहरात पोहचता येते. तसेच रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर खासगी वाहन किंवा बसच्या मदतीने मंदिरापर्यंत पोहचता येते. तसेच सोलापूर शहरा पासून सर्वात जवळचे विमानतळ पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ असून ते २५० किमी अंतरावर आहे. या विमानतळांवरून सोलापूरसाठी टॅक्सी आणि बसच्या मदतीने मंदिरापर्यंत पोहचता येते.